Type Here to Get Search Results !

अनाधिकृत वाळू वाहतूक करताना पकडलेल्या वाहनांचा व वाळूचा 28 मार्चला 'या' ठिकाणी होणार जाहीर लिलाव

प्रतिकात्मक फोटो 


सांगली : सांगली जिल्ह्यातील  कवठेमहांकाळ तालुक्यामधून जी वाहने अनाधिकृत वाळूची वाहतूक करीत असताना पकडून आणून तहसिल कार्यालयाच्या आवारात व पोलीस ठाणे कवठेमहांकाळ येथे लावण्यात आली आहेत.


तरी संबंधित वाहन मालकानी दंड भरला नाही, अशा वाहनांचा व वाहनांमधील वाळूचा जाहीर लिलाव दि. 28 मार्च 2022 रोजी दुपारी 2 वाजता तहसिल कार्यालय कवठेमहांकाळ येथे घेण्यात येणार आहे. तरी इच्छुकांनी लिलावात भाग घ्यावा, असे आवाहन कवठेमहांकाळ तहसिलदार बी. जे. गोरे यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies