Type Here to Get Search Results !

धक्कादायक! मानवी रक्तात प्रथमच सापडले प्लास्टिकचे कण…!




 जागतिक पातळीवर शास्त्रज्ञांनी केलेल्या एका संशोधनात ८० टक्के लोकांच्या रक्ताच्या नमुन्यात काही अंशी प्लास्टिकचे लहान कण सापडल्याची माहिती समोर आली आहे, या शोधातून असे दिसून आले आहे की, मायक्रोप्लास्टिक्स मानवी शरीरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते आणि मानवी अवयवांमध्ये जमा होऊ शकतात. हे कण शरीरात दिर्घकाळ राहिल्याने याचा मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. मायक्रोप्लास्टिक शरीरातील एखाद्या पेशीमध्ये साठून राहिल्याने पेशींचे मोठे नुकसान होत असल्याची भितीही शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.



या संशोधनात शास्त्रज्ञांनी २२ रक्तदात्यांच्या रक्तांचे नमुने घेतले. यामध्ये सर्व निरोगी, प्रौढ व्यक्तींमध्ये १७ जणांच्या रक्तात प्लास्टिकचे कण आढळले आहेत. यातील अर्ध्या रक्ताच्या नमुन्यात पीईटी  प्लास्टिक आढळले आहे, जे सामान्यतः पाणी पिण्याच्या बाटल्यांमध्ये वापरले जाते. तर काही रक्ताच्या नमुन्यात पॉलिस्टीरिन हे प्लास्टिक आढळून आले आहे. जे अन्न आणि इतर उत्पादनांच्या पॅकेजिंगसाठी वापरले जाते. ज्यापासून प्लास्टिकच्या पिशव्याही बनवल्या जातात.



मानवाकडूनच पर्यावरणात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा टाकला जातो. त्यामुळे प्लास्टिकने संपूर्ण पृथ्वीच प्रदूषित केली आहे. माउंट एव्हरेस्टपासून ते महासागराच्या खोलीपर्यंत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पसरले आहे. त्यामुळे वातावरणात सगळीकडेच विविध प्रकारच्या प्लास्टिकचे अस्तित्व आहे. हे मायक्रोप्लास्टिक श्वासोच्छ्वास, पाणी आणि अन्न याच्या माध्यमातून शरीरात जातात. या संशोधनात लहान मुले आणि प्रौढांच्या विष्ठेत मायक्रोप्लास्टिक आढळल्याचे सागण्यात येत आहे.या संशोधनाबाबत बोलताना, प्रोफेसर डिक वेथक म्हणाले, संशोधनातील आमचे हे काही प्राथमिक निष्कर्ष आहेत. या संशोधनातील मानवी रक्तात पॉलिमेरिक कणही आहेत. हा एक महत्त्वाचा शोध अजून बाकी आहे. सध्या शास्त्रज्ञ यासंदर्भातील संशोधन आणखी वाढवण्याचा विचार करत आहेत, असेही ते म्हणाले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies