Type Here to Get Search Results !

सोमय्या, पडळकरांच्या आंदोलनावर "यांची" तिखट शब्दात टीका म्हणाले...........

 



मुंबई : शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या कथित रिसॉर्टबाबत एफआयआर दाखल करण्याच्या मागणीसाठी शनिवारी भाजप नेते किरीट सोमय्या  यांनी दापोलीत केलेले आंदोलन. त्यानंतर आत सांगलीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यावरुन गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचे आंदोलन. या दोन्ही आंदोलनावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी किरीट सोमय्या, गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यावर तिखट शब्दात जोरदार टीका केली आहे. ‘हा ड्रामा व हे ड्रामेबाज म्हणजे महाराष्ट्रात साचलेली घाण आहे’, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी सोमय्या, पडळकर आणि खोतांवर निशाणा साधलाय.



किरीट सोमय्या यांनी शनिवारी दिवसभर दापोलीमध्ये अनिल परब यांच्याविरोधात रान पेटवले. त्यानंतर रविवारी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या लोकार्पणावरुन ठाकरे सरकारला आव्हान दिले. या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी म्हणाले ‘हाय होल्टेज ड्रामेबाजाना महाराष्ट्रातील जनता आता कंटाळली आहे. काल कोकणात तोतला व आज इकडे मंगळसुत्र चोर जो थयथयाट करत आहेत तो थयथयाट राज्यातील हुशार तरुणाई पाहत आहे. हा ड्रामा व हे ड्रामेबाज म्हणजे महाराष्ट्रात साचलेली घाण आहे. आगामी काळात ही घाण जनताच साफ करेल. ‘मंगळसुत्रचोर’, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी सोमय्या, पडळकर आणि खोतांवर जोरदार टीका केली.




पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा पार पडल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केला. एकीकडे शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यास पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी विरोध केला होता. तसेच मेंढपाळांच्या हस्ते लोकार्पण करण्यावर पडळकर ठाम होते. मात्र, कडेकोट पोलीस बंदोबस्तात पडळकर यांना होळकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करणे शक्य नसल्याचे पाहायला मिळाले. अशावेळी पडळकर यांनी पुन्हा एकदा आपला गनिमी कावा दाखवला आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावर ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी करुन लोकार्पण केल्याचा दावा पडळकर यांनी केलाय.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies