Type Here to Get Search Results !

शांतिनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी गाजवला जिमखाना डे ; विद्यामंदिर, डीबीइएम, कन्याशाळेच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिकेमाधवनगर : थोरात अकॅडमीनंतर शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्या मैदानावर विद्यामंदिर, डीबीईएम आणि कन्याशाळेच्या विद्यार्थ्यांनी जिमखाना डे च्या निमीत्ताने आपली चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. त्यांना पालकांकडून उत्स्फुर्त दाद मिळाली.


या जिमखाना डेच्या प्रात्यक्षिकांचे उदघाटन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. माधवी पटवर्धन यांच्या हस्ते व शालेय समितीच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रभा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक गौतम पाटील, सौ. समिता पाटील, मुख्याध्यापक संजय खांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी विद्यार्थ्यांनी योगासने, समुहगान, कराटे, झांज, लेझीम- स्क्वॉड्रील, योगा पिरॅमिड, लाठीकाठी, रॅपलिंग, कुस्ती, जिम्नॅस्टिक, मल्लखांब आदी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. यानंतर बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. उपसंचालक डी.एस. माने व व्ही. के. खोत यांनी सुत्रसंचालन केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies