Type Here to Get Search Results !

अफगाणीस्तानात परत तालिबान्यांची सत्ता ;महिलांच्या स्वातंत्र्यावर पुन्हा निर्बंध...!



काबूल: अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी महिलांनी एकट्याने विमानात प्रवेश करण्यावर बंदी घातली आहे. विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले की, “तालिबान्यांनी सर्व एअरलाईन्सना आदेश दिलेले आहेत की, आता महिलांना पुरुष नातेवाईक असेल तर विमानात प्रवेश देण्यास परवानगी द्यावी.”



अफगाणिस्तानच्या एरियाना अफगाण एअरलाईन आणि काम एअरलाईनच्या दोन अधिकाऱ्यांना रविवारी रात्री तालिबान्यांनी आदेश दिला. त्यांनी सांगितेल की, आमच्याकडून कोणत्याही महिलेला एकट्याने विमान प्रवास करण्यास परवानगी दिली जाणार नाही. दोन अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर एएफपी या वृत्तसंस्थेला त्यांनी सांगितले की, “दोन एअरलाईन कंपन्यांच्या प्रतिनिधी आणि विमानतळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यात गुरूवारी बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.अफगाणीस्तानात पुन्हा तालिबान्यांची सत्ता स्थापन झाल्यानंतर महिलांच्या स्वातंत्र्यावर खूप निर्बंध लादण्यात आले आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies