Type Here to Get Search Results !

भाजपाला मत दिले म्हणून मुस्लीम महिलेला घरातून बाहेर काढले; तीन तलाकचीही दिली धमकी!




उत्तर प्रदेश: भाजपाला मत दिले नाही म्हणून उत्तर प्रदेशातल्या बरेली जिल्ह्यात एका मुस्लीम महिलेला घरातून बाहेर काढल्याची घटना उघडकीस आली आहे. . बरेलीतील उझ्मा अन्सारी यांना घरातून बाहेर काढलेच पण तीन तलाक देण्याची धमकीही देण्यात आली आहे.


एका इंटरनेट वाहिनीच्या वृत्तानुसार, उझ्मा माध्यमांशी बोलताना सांगत आहेत की, त्यांना घरातून हाकलण्यात आले आहे.त्याचबरोबर  त्यांना तीन तलाकची धमकीही देण्यात आली आहे. उझ्मा या गौंतिया इजाजनगर इथल्या रहिवासी आहेत. त्यांना त्यांच्या पतीचे मामा तयब यांनी समाजवादी पक्षाला मत देण्यास सांगितले होते. परंतु, त्यांनी भाजपाला मत दिल्याने आता त्यांना तीन तलाकच्या धमक्या देण्यात येत आहेत.



मिळालेल्या माहितीनुसार, उझ्मा यांना ११ मार्च रोजी घरातून बाहेर काढण्यात आले. बरादरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आणि चौकशीही सुरू झाली आहे. आपल्या पतीसोबत भाड्याच्या घरात राहणाऱ्या उझ्मा यांनी भाजपाला मत दिले होते.



 उझ्मा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, त्यांची आर्थिक परिस्थिती फारशी बरी नाही, त्यांना चार बहिणी आहेत आणि त्यांचे वडील मजूर आहेत. महिन्यातून दोन वेळा भाजपा सरकारकडून मोफत किराणा आणि इतर अत्यावश्यक गोष्टींचं वाटप केले जात होते हे त्यांना आवडले .



ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी घरात उझ्मा यांच्या पतीचे मामा उत्तर प्रदेशात पुन्हा योगी सरकार येणार अशी चर्चा करत होता. त्यावेळी बोलताना उझ्मा यांनी सांगितले की मीही योगींच्या बाजूने मत दिले आहे. त्यानंतर संतापलेल्या तयब यांनी उझ्मा यांना तीन तलाकची धमकी दिली आणि सरकारलाच आता घटस्फोटापासून तुला वाचवायला सांग अशी धमकी देत घरातून हाकलले. या प्रकरणी पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला आहे, ते या प्रकरणाची चौकशी करत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies