Type Here to Get Search Results !

"या" विमानाचा पंखा विजेच्या खांबावर आदळला....!
दिल्ली : आज सकाळी प्रवाशांना घेऊन उड्डाण करणाऱ्या स्पाईसजेटचे एक विमान दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विजेच्या खांबाला धडकले. पुशबॅक दरम्यान ही घटना घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आज सकाळी साडेनऊच्या सुमारास हि घटना  घडली आहे.स्पाईसजेटचे हे विमान पॅसेंजर टर्मिनलहून रन-वेकडे जात होते. या विमानाचा एक भाग पुशबॅक होत असताना एक विजेच्या खांबाला धडकला. ही धडक इतकी मोठी होती की, विजेचा खांब संपूर्ण वाकला. त्याचबरोबर विमानाच्या पंख्याचेदेखील नुकसान झाले आहे. विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “या घटनेनंतर प्रवाशांना त्या विमानातून सुखरुप बाहेर काढले आणि दुसऱ्या विमानात बसविण्यात आले. या घटनेमध्ये प्रवाशांना कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही.”एअरलाईनच्या माहितीनुसार विमान क्रमांक एसजी १६० दिल्लीहून जम्मूला जाणार होते. पुशबॅक करत असताना ही घटना झाली. विमानाचा उजवा पंखा विजेच्या खांबाला धडकला. त्यामध्ये अर्धाहून अधिक  विजेचा खांब वाकला. घटनेनंतर त्वरीत दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली आणि प्रवाशांना हालविण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies