Type Here to Get Search Results !

डोळ्यांचे फडफडणे शुभ आहे का अशुभ; जाणून घ्या माहिती!
आटपाडी: डोळा हा माणसाच्या शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. डोळे फडफडणे हे खूप सामान्य लक्षण आहे. डोळा हा काही सेकंदासाठी किंवा १ ते २ मिनिटांपर्यंत फडफडत असतो. पण डोळा फडफडणे यामागे शुभ, अशुभ अशी कारणे जोडली जातात.पण  स्त्री आणि पुरुष यांचा उजवा आणि डावा डोळा फडफडणे यामागेही वेगवेगळे अर्थ असतात.वास्तुशास्त्रानुसार किंवा ज्योतिषशास्त्रानुसार डोळ्याची फडफड होते  हे शुभ आणि अशुभ अशा दोन्हीही घटनेचे संकेत देत असतात. भविष्यात होणाऱ्या एखाद्या घटनेची पूर्वसूचना आपल्याला याद्वारे मिळते, असे म्हणले जाते. जर एखाद्या पुरुषाचा उजवा डोळा फडफडत असेल किंवा त्या डोळ्याची पापणी लवत असेल तर ते अत्यंत शुभ मानले जाते. अशा पुरुषांना भविष्यात मोठा आर्थिक फायदा होतो. त्यांची अडकलेले अनेक कामे मार्गी लागतात. विशेष म्हणजे त्यांना कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळू शकते. तसेच त्यांच्यावर लक्ष्मी प्रसन्न होते व  त्यांना आर्थिक नफा होऊ शकतो असे मानले जाते.तसेच, स्त्रियांच्याबाबत ही गोष्ट उलट होत असते.पण  जर महिलांचा उजवा डोळा किंवा पापणी फडफडत असेल तर ते अत्यंत अशुभ मानले जाते. याद्वारे तुम्हाला भविष्यात येणाऱ्या एखाद्या अशुभ घटनेची किंवा संकटाची सुचना मिळते.जर एखाद्या महिलेचा डावा डोळा किंवा डाव्या डोळ्याची पापणी फडफडत असेल तर तिला लवकरच मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies