Type Here to Get Search Results !

मुंबईत इमारतीचे छत कोसळून अपघात; कुटुंब रात्री झोपलेले असताना घडली घटना!




मुंबई: नालासोपारा मध्ये घराचा छत कोसळल्याची घटना घडल्याची माहिती उघडकीस आली आहे. या घटनेत चार जण जखमी झाल्याचे समोर आहे. नालासोपारा पश्चिमेला हनुमान नगरमध्ये घराच्या छताचा स्लॅब कोसळला. मध्यरात्री १२ वाजता घरातील सर्व लोक झोपलेले असताना ही घटना घडली आहे. यामुळे घरातील चार व्यक्ती जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.



घटनास्थळ व मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पश्चिम मधिल जयकृष्ण इमारतीमध्ये राहणारे जाधव कुटुंब रात्री झोपलेले असताना घराच्या छताचा स्लॅब कोसळला. या घटनेत प्रशांत जाधव गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सर्वात जास्त मार लागल्याची माहिती समोर येत आहे. प्रशांत जाधव यांना मुंबईतील नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर इतरांची प्रकृती गंभीर नसल्याचे म्हटले जात आहे. ही घटना घडली तेव्हा घरात ८ लोक होते, त्यापैकी चार जण जखमी झाले आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies