Type Here to Get Search Results !

आजचे राशिभविष्य; जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस!





मेष:-

भावंडांशी खेळीमेळीचे वातावरण राहील. मुलांची प्रगती होताना दिसेल.  विरोधकांपासून  सावध राहावे. तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल. दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर द्यावा.



वृषभ:-

मित्रपरिवाराची अपेक्षित मदत मिळेल. सहकार्‍यांशी असणारा वाद संपेल. कलाकार मंडळींची प्रगती होईल. महत्त्वाची कामे यशस्वी होतील. बौद्धिक कामे करणार्‍यांना चांगली संधि मिळेल.



मिथुन:-

नसते साहस करू नका.वाहन जपून चालवावे. राजकारणापासून दूर राहावे. नोकरी निमित्त प्रवास करावा लागेल. छोट्या कारणांवरून रूसवे फुगवे होण्याची शक्यता आहे. 



कर्क:-

सहकुटुंब तीर्थयात्रेचा योग येईल. कलाकारांचे मनोरथ पूर्ण होईल. जोडीदाराला अचानक लाभ संभवतो. मुलांच्या शुभ वार्तेने आनंद होईल . आनंदाच्या भरात हुरळून जाऊ नका. 



सिंह:-

पर्यटनाचा विचार मनात येईल. कामानिमित्त बराच प्रवास करावा लागेल. पर्यटनाचा विचार मनात येईल. पैशाचा अपव्यय होणार नाही ह्याची काळजी घ्यावी.  घराचे सुशोभीकरण काढाल. घरासाठी नवीन वस्तू खरेदी कराल.



कन्या:-

आर्थिक गरज पूर्ण होईल. कोणतेही गोष्ट अती करू नये. आलेल्या संधीचे सोने करावे.तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल. पदोन्नतीचे योग संभवतात.



तूळ:-

बेफिकिरपणे वागू नका. सांस्कृतिक कामात सहभाग घ्याल. मुलांना उल्लेखनीय प्रशस्तिपत्रक मिळेल. जोडीदाराचे मत तुम्हाला पटणार नाही. कोणत्याही गोष्टीच्या जास्त खोलात जाऊ नका.



वृश्चिक:-

तुमच्यातील कलागुणांची वाढ होईल. प्रेमप्रकरणात सावधानता बाळगा. तुमचा  अंदाज  अचूक ठरेल. योग्यायोग्याची खात्री करावी. मौज मजेकडे कल राहील. तुमच्यातील कलागुणांची वाढ होईल.



धनू:-

अनिष्टता टाळण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक सुख-शांती जपावी. वाहन विषयक कामे निघतील. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. व्यवसायिक ठिकाणी मन लावून काम करावे. 



मकर:-

वारसाहक्काच्या कामांतून लाभ संभवतो. कौटुंबिक ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा.आर्थिक कोंडी सोडवावी लागेल. व्यवसायिकांनी सजगता दाखवावी. कागदपत्रांवर विचारपूर्वक सह्या कराव्यात. 



कुंभ:-

कष्ट करण्यात कमी पडू नका. प्रकृतीची हेळसांड करू नये. जोडीदाराचे वर्चस्व राहील. वेळेचे मोल लक्षात घ्यावे. सामाजिक सेवेत पुढाकार घ्याल.



मीन:-

मुलांची काळजी लागून राहील.चांगला आर्थिक लाभ होईल. मोहापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. कोणावरही विसंबून राहू नका. मित्रपरिवारात वाढ होईल. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies