Type Here to Get Search Results !

मायक्रोवेव्हमध्ये सापडला दोन महिन्याच्या मुलीचा मृतदेह: बाळाच्या पालकांची पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुरु!



नवी दिल्ली: दोन महिन्याची मुलगी मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये मृतावस्थेत आधाल्याची घटना उघडकीस आली आहे.काल दक्षिण दिल्लीतील चिराग दिल्ली भागातून ही घटना घडली आहे.काल दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास बाळाच्या मृत्यूची माहिती मिळाली असता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तसेच अज्ञात व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे बेनिता मेरी जायकर, पोलीस उपायुक्त दक्षिण यांनी सांगितले आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात मुख्य संशयित बाळाची आई आहे. कारण, मुलीच्या जन्मामुळे ती नाराज होती. मृत मुलीचा जन्म या वर्षी जानेवारीमध्ये झाला होता आणि तेव्हापासून डिंपल कौशिक या नाराज होत्या. यावरून त्यांनी पतीशी भांडणही केले होते,” अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने माध्यमांना दिली आहे. 


 

तसेच, “डिंपल कौशिक यांनी स्वतःला घरात कोंडून घेतले होते, त्यानंतर त्यांच्या सासूने आरडाओरड केली नंतर आम्ही काच फोडली आणि खोलीत प्रवेश केला. तेव्हा आम्हाला त्या त्यांच्या चार वर्षांच्या मुलासह बेशुद्ध अवस्थेत पडलेली आढळली, परंतु दोन महिन्याची मुलगी बेपत्ता होती, त्यानंतर तिचा शोध घेतला असता ती मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये आढळली. तर महिलेचा पती ही घटना घडली त्यावेळी घरी नव्हता,” असे एका शेजाऱ्याने बाळाच्या मृत्यूबद्दल पोलिसांना माहिती देत असताना सांगितले आहे. बाळाचे पालक, गुलशन कौशिक आणि डिंपल कौशिक यांची पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केली जात असून पुढील तपास सुरू आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies