Type Here to Get Search Results !

भांडणे सोडवायला गेल्यावर आरोपीने पोलिसांवर केला ‘कोयत्याने’ वार!






पुणे: शहरात दिवसेंदिवस वाढत असलेली पोलीस प्रशासनासाठी   त्रासदायक  विषय बनला आहे. सतत घडणाऱ्या हल्ल्याच्या घटनांमुळे शहरात कुणालाही भीती उरलेली नाही असे चित्र दिसून येत आहे.  शहरातील कात्रज चौकात किरकोळ वादातून टोळक्याने तरुणावर हल्ला केला. या तरुणांचा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या ड्युटीवरील वाहतूक पोलिसावरही या टोळक्याने कोयत्याने जीवघेणा हल्ला करून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी कात्रज चौक पोलिसांनी आरोपी कैफ आरिफ शेख (वय-18  संतोष नगर कात्रज) याला अटक केली आहे. या प्रकरणी प्रीतम माधव लोणकर (वय -30 ) यांनी कात्रज पोलिसात तक्रार दिली आहे.




घटनास्थळ व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  प्रितम लोणकर हा मित्रांबरोबर चहा पिण्यासाठी हॉटेल गणेश येथे गेला होता. तेथे गाडी पार्क करीत असताना एका मुलाने त्यांच्याबरोबर वाद घालून शिवीगाळ केली. ही वादा सुरु असताना संबंधित मुलाने मी कोण आहे ते दाखवितो, असे म्हणून त्याने तेथे असलेल्या त्याच्या इतर साथीदारांना बोलावून आणले. त्या मुलाचे साथीदार आल्यानंतर त्यांनी प्रीतमला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर फिर्यादी प्रीतमला आमन मुल्ला व संकेत यांनी पकडून ठेवले.त्यानंतर कैफ याने त्याच्याकडे असलेल्या कोयत्याने लोणकर यांच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार केला. या घटनेत प्रीतमच्या उजव्या हाताच्या करंगळीवर लागून ते जखमी झाले.




पोलिसांच्या ड्युटीवर असलेले पोलीस शिपाई मनोज बदडे तेथे आले. त्यांनीही भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला. त्याचे प्रयत्न सुरु असतानाच आरोपी कैफ आरिफने त्याच्या हातावर कोयत्याने वार केल्यामुळे तेही जखमी झाले आहेत. या घटनेनंतर कात्रज चौक पोलिसांनी आरोपी कैफ आरिफ शेख याला अटक केली आहे. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies