Type Here to Get Search Results !

एसबीआयमध्ये लिपिक, पीओ पदासाठी लवकरच भरती; जाणून घ्या माहिती!

 



बँकिंग क्षेत्रात नोकरीची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. सरकारी नोकऱ्यांसाठी तयारी करत असलेले तरुण स्टेट बँक ऑफ इंडिया, एसबीआयद्वारे होणाऱ्या भरतीची वाट पाहत असतात. उमेदवार या वर्षी देखील एसबीआय लिपिक भरती २०२२ आणि एसबीआय पीओ भरती २०२२ च्या जाहिरातीची वाट पाहत आहेत. भरती अधिसूचना दरवर्षी जानेवारी ते एप्रिल यादरम्यान प्रसिद्ध केली जाते. तसेच, या वर्षी सुद्धा अधिसूचना एप्रिल महिन्यात प्रसिद्ध होईल अशी आशा आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, एसबीआय लिपिक भरती २०२२ आणि एसबीआय पीओ २०२२ ची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. तर एसबीआय लिपिक भरती प्राथमिक परीक्षा २०२२ जून-जुलै या कालावधीत आयोजित केली जाण्याची दाट शक्यता आहे. या पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. पदवीचे अंतिम वर्ष/सेमिस्टरचे विद्यार्थी एसबीआय लिपिक भरती २०२२ साठी अर्ज करू शकतात.



एसबीआय लिपिक भरती २०२२ साठी उमेदवारांचे वय कमीत कमी २० वर्षे आणि जास्ती जास्त २८ वर्षे असावे. एसबीआय पीओ भरती २०२२ साठी उमेदवारांचे वय किमान २१ वर्षे आणि कमाल ३१ वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार उच्च वयोमर्यादेत सूट मिळण्याची दाट शक्यता आहे.


एसबीआय लिपिक परीक्षा खालीलप्रमाणे,


-प्राथमिक परीक्षा
-मुख्य परीक्षा
-स्थानिक भाषा चाचणी



एसबीआय पीओ परीक्षा खालीलप्रमाणे,
-प्राथमिक परीक्षा
-मुख्य परीक्षा
-मुलाखत



एसबीआय लिपिक पगार खालीलप्रमाणे,


बेसिक पे- १९,९००/- (१७,९००/- + पदवीधरांसाठी दोन ॅडव्हान्स इन्क्रीमेंट).



पे स्केल- १७,९००-१०००/-२०९००-१२३०/-२४,५९०-१४९०/-३०,५५०-१७३०/-४२६००-३२७०/-४५,९३०-१९९०/-४७,९२० रुपये



एसबीआय पीओ पगार खालीलप्रमाणे,
एसबीआय पीओचा पगार ४१,९६० रुपये प्रति महिना (मूलभूत वेतन) पासून सुरू होतो. प्रोबेशनरी अधिकारी/व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी यांची वेतनश्रेणी ३६,०००-१४९०/-४६४३०-१७४०/-४९९१०-१९९०/-६३८४० आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies