उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये एका दिव्यांग व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हे प्रकरण जेवार भागातील आहे जिथे एका जोडप्याने आपल्याच नातेवाईकाला काठीने मारहाण केली आणि त्याची स्कूटरही फोडली. पीडित गजेंद्रच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी जुगेंद्र आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, आधी एक तरुण एका दिव्यांग व्यक्तीला काठीने बेदम मारहाण करतो, त्यानंतर एक महिलाही काठी आणते आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात करते. स्कूटरवर बसलेल्या अपंग व्यक्तीला पळूनही जाता येत नव्हते.
नफरत के इस दौर में हम किस मुकाम पर आकर खड़े हो गए है, इस पर पुनः चिंतन की जरूरत है..
ये तस्वीरें इंसानियत को शर्मसार करने वाली है.. pic.twitter.com/jcP5NH1xHk
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ २७ मार्चचा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. यामध्ये गजेंद्र या दिव्यांग तरुणाला त्याच्याच नातेवाईकांनी मारहाण केली आहे. दरम्यान, आरोपी जुगेंद्रने दिव्यांग व्यक्ती गजेंद्रला त्याची शाळा चालवण्यासाठी दिली होती. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून लॉकडाऊनमुळे शाळा बंद होत्या. हे पाहता जुगेंद्रने शाळा भाड्याने घेतली. या प्रकरणावरून जुगेंद्र आणि गजेंद्र यांच्यात जोरदार वाद झाला. रागाच्या भरात जुगेंद्रने पत्नीसह गजेंद्रला मारहाण केली आणि त्याची स्कूटरही फोडली.