महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेतील डॉक्टर रवी गोडसे यांनी महाराष्ट्र राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत करताना काही सल्ले देखील दिले आहेत.
चिऊ ताई चिऊ ताई दार उघड थांब माझ्या बाळाला अंघोळ घालते, थोडासा घोळ घालते.चिऊ ताई चिऊ ताई दार उघड चिऊ ताई थांब माझ्या बाळाला थीट लाव तुझ्या दुधाला मीठ लावते. शेवटी दार उघडलं याबद्दल शाब्बास, वॅक्सिनेशनच्या कामाला चांगला सपोर्ट केला. चिऊताईंच्या वेगवेगळ्या समित्या आणि कमिट्या आहेत त्यांना माझी एक चिमुकली विनंती आहे की आपली चिमणी बुद्धीपणाला लावून दुसरी काही लफडी करु नका. दार उघडले तसेच ते सतत उघडे ठेवा आणि दूर उडून जावा आणि दाणे टिपायला नवीन अंगण घ्यावा, असे रवी गोडसे म्हणाले.