Type Here to Get Search Results !

महाराष्ट्रात एप्रिलमध्ये बँकांना नऊ दिवस सुट्टी; बँकाच्या सुट्ट्या तपासूनच बँकेला भेट द्या!






महाराष्ट्र: एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात ९ दिवस सुट्टी असणार आहे. तुमच्या कामात अडचणी निर्माण होऊ नये म्हणून आम्ही सुट्ट्यांची यादी देत आहोत. सध्या आरबीआयने म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक सुट्ट्यांची यादी जाहीर केली गेली आहे. संपूर्ण एप्रिल महिन्यात प्रत्येक राज्यात किती सुट्ट्या आहेत हे या यादीत सांगितले आहे. प्रत्येक राज्यातील सणांनुसार बँका बंद राहतात. तुम्हाला काही आवश्यक कामासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता असेल तर बँकाच्या सुट्ट्या तपासूनच बँकेला भेट द्या.



मिळालेल्या माहितीनुसार, २ एप्रिल – बेलापूर, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, इंफाळ, जम्मू, मुंबई, नागपूर, पणजी आणि श्रीनगर या ठिकाणी  गुढीपाडवा, उगादी, नवरात्रीचा पहिला दिवस, तेलुगु नववर्ष, साजिबू नोंगमपांबा सण यामुळे या दिवशी बँका बंद राहतील.


तसेच,

३ एप्रिल – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

९ एप्रिल- शनिवार (साप्ताहिक सुट्टी)

१० एप्रिल – रविवार, साप्ताहिक सुट्टी आणि राम नमवी

१४ एप्रिल – डॉ. भीमराव आंबेडकर जयंती, महावीर जयंती

१५ एप्रिल – गुड फ्रायडे

१७ एप्रिल – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

२३ एप्रिल – शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार)

२४ एप्रिल – रविवार (साप्ताहिक सुट्टी)राहील .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies