Type Here to Get Search Results !

मध्य रेल्वेवर रविवारी “एवढ्या” तासांचा मेगाब्लॉक’ जाणून ह्या माहिती!





मुंबई : दिवा स्थानकाजवळ विविध तांत्रिक कामांसाठी उद्या २७ मार्चला मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.  ठाणे ते कल्याण अप, डाऊन जलद मार्गावर सकाळी ९ ते रात्री ९ असा बारा तासांचा मेगाब्लॉक असेल.



मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटीहून सुटणाऱ्या जलद लोकल सकाळी ७.५५ ते रात्री ७.५० पर्यंत मुलुंड ते ठाणे, कल्याण दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. तर कल्याणहून सुटणाऱ्या अप जलद लोकल सकाळी ८.३६ ते रात्री ७.५० पर्यंत कल्याण ते मुलुंड दरम्यान अप धीम्या मार्गावर धावतील. या मार्गावरील लोकल १० ते १५ मिनिटे विलंबाने धावणार असून काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची दाट  शक्यता आहे.


तसेच, ठाणे ते वाशी, अप व डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर २६ मार्चला रात्री ११.४५ ते २७ मार्चला पहाटे ५.४५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे ते वाशी, नेरूळ, पनवेल दरम्यानच्या अप व डाऊन लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.उद्या  पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात आलेला नाही.परंतु, २६ मार्चच्या रात्री ११.४५ वाजल्यापासून ते पहाटे ४.४५ वाजेपर्यंत बोरिवली ते अंधेरी स्थानकादरम्यान दोन्ही जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies