Type Here to Get Search Results !

“मी आत्महत्या करण्याची इच्छा पूर्ण करतोय, कारण…”; अशी नोटीस लिहित विद्यार्थ्याची आत्महत्या!

 




नागपूर : बारावीच्या विद्यार्थ्याने मला दहावीपासूनच आत्महत्या करण्याची इच्छा होती. मी कसातरी बारावीपर्यंत संयम बाळगला, आता मी आत्महत्या करण्याची इच्छा पूर्ण करतोय,’ अशी आत्महत्या नोट मोबाईलमध्ये लिहून आत्महत्या केली आहे. आदित्य मधूकर मोवाडे असे आत्महत्या केलेल्या  विद्यार्थ्याचे नाव आहे.



घटनास्थळ, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधूकर मोवाडे आणि त्यांची पत्नी दोघेही बँकेत नोकरीवर आहेत. त्यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा अभियांत्रिकेचे शिक्षण घेतो, तर लहान मुलगा आदित्यने सध्या बारावीची परीक्षा दिली आहे. मंगळवारी आई-वडिल बँकेत गेले होते, तर भाऊ बाहेर गेला होता. त्यावेळी आदित्यने सायंकाळी सहा वाजता मोबाईलमध्ये सुसाईड नोट लिहिली आणि खिडकीला दोरीने गळफास घेऊन आत्मत्या केली. सायंकाळी भाऊ घरी आल्यानंतर ही घटना घडल्याचे समोर आले. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies