Type Here to Get Search Results !

गॅसच्या दरवाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत केंद्र सरकारवर निशाणा साधला


महागाईच्या मुद्द्यावरून विरोधक मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत. महागाई कमी करण्याच्या मागणीसाठी आंदोलने  सुरू आहे. पण महागाई सातत्याने वाढत आहे. पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.


सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत महागाईचा मुद्दा उपस्थित करताना सांगितले की, “सरकारी योजनेंतर्गत महिलांना गॅसची सुविधा देणाऱ्या सरकारने गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ केली आहे. या सरकारने निवडणुकीपूर्वीच म्हटले होते की, ‘बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार’ हे तर तुम्हाला आठवतच असेल” असे त्यांनी मंत्री अर्जुन राम मेघवाल यांना म्हटले आहे.


मंत्री मेघवाल म्हणाले की, सध्या महागाई नियंत्रणात आहे. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘महागाई नियंत्रणात आहे? सिलिंडर हजार रुपयांचा झाला आहे. मेघवाल जी सभागृहातल्या महिलांचे ऐका, या महिलांमुळेच तुम्ही सरकार स्थापन केले.’ त्यानंतर त्यांनी अंडी आणि भाजीपाल्यांच्या वाढत्या किमती लक्षात आणून दिल्या. 


पुढे त्या मंत्री मेघवाल यांनी म्हणाल्या की, ‘भाजीचे भाव.. घरी जा आणि वहिनीला विचारा, आज त्या तुम्हालाही बोलतील. आता काही दिवसांपूर्वीच होळी गेलीये, त्यामुळे वाईट वाटून घेऊ नका. देशात दर महिन्याला निवडणूक व्हायला हवी, जेणेकरून पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात राहतील,’ असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies