"या" गंधर्व लॉन्सजवळ शेडमधील तब्बल २० सिलेंडरचा स्फोट!


पुणे: कात्रज गंधर्व लॉन्सजवळील सुंदा माता मंदिराच्या जवळ एका पाठोपाठ एक अशा २० सिलेंडरचा स्फोट झाला. या घटनेची माहिती अग्शिनशामक दलाला दुपारी मिळाली. त्यानंतर दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.


दरम्‍यान, या ठिकाणी सिलेंडरचे गोडाऊन असल्याबाबतची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना समोर आली आहे. या घटनेत सिलेंडरचा स्फोट होऊन आगीचे दूरवर हवेत भडके पसरले होते. सिलेंडरचे होणारे स्फोट पाहून स्थानिक नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.


 अद्याप स्‍फोटाचे कारण समजले नाही. तसेच या स्फोटात कोणतीही जिवीत हाणी झालेली नाही अशी माहिती  अग्निशमन दलातील अधिकार्‍यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured