Type Here to Get Search Results !

उरणमधील शिवस्मारक पर्यटकांसाठी खुले करण्याचा निर्णय; दहा दिवसांत खुले करण्यात येणार!








उरण : जेएनपीटीने ३२ कोटी खर्चून उभारलेल्या व लाखो शिवप्रेमी व दासभक्तांना उत्कंठा लागून राहिलेले उरणमधील भव्य २० मीटर उंचीचे शिवस्मारक पर्यटकांसाठी दहा दिवसांत खुले करण्यात येणार आहे .



उद्घाटनानंतर लगेच करोनामुळे मागील दोन वर्षांपासून हे स्मारक बंद ठेवण्यात आले होते. आता ते खुले होणार आहे. उरण तालुक्यातील जासई-दास्तानफाटा दरम्यान ३२ कोटी खर्चुन १९.३ मीटर उंचीचे हे भव्य शिवस्मारक नऊ हजार चौरस मीटर क्षेत्रात जेएनपीटीकडून उभारण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या भेटीवर आधारित.उभारण्यात आलेल्या या स्मारकाची तळमजल्यापासून उंची १९.३ मीटर आहे. राज्यातील इतक्या मोठय़ा उंचीचे हे एकमेव शिवस्मारक स्मारक आहे.



१७ फेब्रुवारी २०१९ रोजी या शिवस्मारकाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत झाले होते .पुढील पिढीसाठी प्रेरणादायक  ठरु  शकतात,पाहाणाऱ्या या ऐतिहासिक भव्य-दिव्य अशा शिवस्मारकाची विशेषत आहे की  दासभक्तांना मोठी उत्कंठा लागून राहिली होती. त्यांचेचेही स्वप्न या निमित्ताने साकार झाले होते.मात्र करोनामुळे हे शिवस्मारक उद्घटनांनतर मागील दोन वर्षे पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. आता ते दोन वर्षानंतर खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



दोन वर्षे पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले होते,पण आता ते खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटकांकडून नाममात्र प्रवेश शुल्क आकारून हे शिवस्मारक अनुभवता येणार आहे.पाच मजली भव्य स्मारक तळमजल्यावर ४८० चौरस मीटरचा भव्य बहुउद्देशीय सभागृह असून या सभागृहात उपाहारगृह, ग्रीनरुम आणि संग्रहालय उभारण्यात आले आहेत. या संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies