Type Here to Get Search Results !

दीड वर्षाच्या चिमुकल्याला टेम्पोने चिरडले...!



कल्याण: या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या बालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात टेम्पो चालक सैफ फारुखी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.



कल्याणजवळ असलेल्या बल्याणी परिसरात उमर शहा हा आपली पत्नी गुलशन, सात वर्षाचा मुलगा, 3 वर्षाची मुलगी व दीड वर्षाचा मुलगा यांच्यासोबत राहतात. उमर विक्रोळी येथे कामाला असून 24 तारखेला नेहमीप्रमाणे सकाळी ते कामावर निघून गेले. त्यानंतर साडे अकरा वाजण्याच्या सुमारास उमर यांची तिन्ही मुले घराच्या बाजूला असलेल्या मैदानात टेम्पो शेजारी खेळत होती. याच दरम्यान टेम्पो चालक आला आणि थेट टेम्पोत बसून टेम्पो पुढे नेला. मात्र या टेम्पो चालकाचा निष्काळजीपणा शेजारी खेळत असलेल्या दीड वर्षाच्या बालकाच्या जीवावर बेतला. टेम्पो शेजारी खेळत असलेल्या दीड वर्षाच्या चिमुकल्याच्या अंगावरून टेम्पोले चाक गेले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies