Type Here to Get Search Results !

आज पुन्हा भारतीय सैन्याच्या गोटात नव्या मिसाईलचा समावेश; जाणून घ्या मिसाईलची वैशिष्ट्य!

 भारतीय सैन्यात नेहमीच आपल्यागोटा मध्ये नवीन नवीन मिसाईलचा समावेश करत असतो. शत्रू राष्ट्र पासून सुरक्षा मिळवण्यासाठी किंवा आपले लक्ष बळकट मजबूत बनवण्यासाठी वेगवेगळे शस्त्र अस्त्र नेहमी तयार करत असतो. भारतीयसेने कडे अनेक मिसाईल आहेत. या सगळ्या मिसाईलने आता पर्यंत उत्तम कामगिरी केली आहे. ओडिशा येथील बालासोर मध्ये इंटीग्रेटेड टेस्ट रेंज द्वारे हवेत थेट निशाणा साधणाऱ्या मिसाइलचे आज परीक्षण केले आहे. ही एक मध्‍यम रेंज असलेली मिसाइल आहे. या मिसाईल भारतीय सेनेसाठी तयार केली आहे. आज मिसाइलचे परीक्षण केल्यानंतर हे परीक्षण सफल झाले आहे. टेस्टिंग दरम्यान या मिसाइलने आपले टार्गेट काही मिनिटांमध्येच उद्ध्वस्त केले आणि अपेक्षित रिझल्ट देखील मिळवला.या मिसाइलची निर्मिती रक्षा अनुसंधान आणि विकास संगठनने इस्त्राईल एयरोस्‍पेस इंडस्‍ट्री कंपनी या दोघांनी मिळून केली आहे. मिसाइल जमिनीवरून थेट हवेत निशाणा साधते. हि मिसाईल इस्त्राईल मधील धोकादायक मिसाइल बराक-8 च्या धर्तीवर बनवण्यात आली आहे.मिसाईलची वैशिष्ट्यMRSAM चे वजन सर्वसाधारण पणें 275 किलो ग्रॅम आहे . याची लांबी 4.5 मीटर आणि व्यास 0.45 मीटर आहे. या विशेष अश्या मिसाइलवर 60 किलोग्रॅम चे शस्त्र लोड केले जाऊ शकते. ही एक सेकंड स्टेज असणारी मिसाइल आहे,जे लॉन्च केल्यानंतर कमी धूर बाहेर सोडते.हे मिसाईल 70 किलोमीटर पर्यंतच्या रेंज मध्ये येणाऱ्या टारगेट ला उद्ध्वस्त करू शकते, असे डीआरडीओने  म्हटले आहे. या मिसाइलची गती प्रचंड वेग घेणारी आहे. भारताची ही मिसाईल 2,448 किलोमीटर प्रति तास वेगाने शत्रूवर हल्ला साधू शकते. फक्त गतीच नाही तर या मिसाइलचे खूप सारे विशेष गुणधर्म आहेत. जर शत्रु आपल्या मिसाईल मध्ये रेडिओ फ्रीविन्सीचा वापर करत असेल तर समोरील शत्रूला गाफील ठेवून शत्रूवर हल्ला देखील हे मिसाईल करु शकते. या विशेष गुणामुळे हे मिसाईल भारतीय सेनेसाठी खूपच लाभदायक ठरणार आहे त्याचबरोबर भारतीय सेनेच्या शस्त्रसाठयामध्ये देखील नव्याने आलेल्या या मिसाईलमुळे भारतीय सैन्यात अजून एका मिसाईल ची भर झाली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies