Type Here to Get Search Results !

मद्यधूंद झालेल्या पोरीचा रस्त्यावर राडा..!



मुंबई :  मद्यधुंदित एका तरुणीने रस्त्यावर थेट पोलिसाची गच्ची पकडून गैरवर्तन केली आहे. नशेमध्ये बेधुंद असलेली ही  तरुणी पोलिसासोबत उद्धटपणे वागत होती आहे. मात्र, दुसरीकडे आपले कर्तव्य बजावणारा पोलीस या मद्यधुंद तरुणींना समजावत होता. या मद्यधुंद तरुणींनी आधी ओला ड्रायव्हरसोबत शिविगाळ केली आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांनाही जुमानले नाही. अशा प्रकारे पोलिसांशी गैरवर्तन करणे, त्यांच्याशी नशेत वाद घालणे, त्यांची गच्ची पकडण्यापर्यंत मजल जाणे, या मुंबईत सुरू आहे. मुंबई पोलीस  अहोरात्र मुंबईकरांच्या सेवेत असतात. चोवीस ते आठ्ठेचाळीस तास ते आपली सेवा बजावतात. मात्र, त्यांच्यासोबत अशा प्रकारे गच्ची पकडण्यापर्यंत मजलं जात असेल तर कारवाईला इतका उशिर का व्हावा, असा प्रश्न आता थेट मुंबईकर  विचारला आहे.



मद्यधुंद अवस्थेतल्यातीन तरुणींनी ओला चालकाला शिविगाळ केला. या तिन्ही तरुणी मुंबईतल्या आहेत. या तरुणी ओला ड्रायव्हरसोबत वाद घालत होत्या. ओला ड्रायव्हरने मुंबई पोलिसांना आवाहन केले आहे की, या शिविगाळ करणाऱ्या तिन्ही तरुणींवर कारवाई करावी. या तिन्ही गैरवर्तन करणाऱ्या तरुणींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies