Type Here to Get Search Results !

आजचे राशिभविष्य! गुरुवार ३१ मार्च २०२२ ; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

 



 

मेष:-साज सौंदर्याची हौस पूर्ण कराल. तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी ठरेल. प्रेमाच्या दृष्टीने नवीन मैत्री लाभेल. सर्वांशी मधुर वाणीने बोलाल. आनंदी दृष्टीकोन ठेवाल.



वृषभ:-

प्रवासात आरोग्याची काळजी घ्यावी. प्रकृतीची किरकोळ तक्रार जाणवेल. टीकेकडे दुर्लक्ष करावे. कामात चंचलता आड येऊ शकते. भावंडांची बाजू जाणून घ्यावी.



मिथुन:-

करमणुकीसाठी अधिक वेळ घालवाल.रेस मध्ये चांगला लाभ होईल. घेतलेल्या ज्ञानाचा योग्य उपयोग होईल. काहीसे छांदीष्टपणे वागाल. मुलांच्या वेगळ्या खर्चाचे नियोजन करावे.



कर्क:-

सजावटीच्या वस्तु खरेदी कराल.उत्तम वाहन सौख्य लाभेल. घरातील ज्येष्ठांची मदत होईल. हसत खेळत सर्व गोष्टी पार पडाल. मनाचा सज्जनपणा दाखवाल.



सिंह:-

जवळचे मित्र भेटतील. मनातील निराशा बाजूस सारावी. चंचलतेत वाढ होऊ शकते. भावंडांच्या समस्या समजून घ्याल. दूरच्या प्रवासाचा योग येईल.



कन्या:-

व्यावसायिक लाभ उत्तम होईल. जुन्या कामातून लाभ होईल. पैशाचा सदुपयोग कराल. मौल्यवान वस्तूंची आवड दर्शवाल.  खाण्या पिण्याबाबत चोखंदळ राहाल.



तूळ:-

प्रशासकीय भूमिका घ्याल. आपले कर्तव्य योग्य रीतीने पार पाडाल. आपले मत इतरांना मान्य करण्यास भाग पाडाल. कामाचा उरक वाढेल. चिकाटीने कामे कराल.



वृश्चिक:-

आध्यात्मिक उन्नती साधण्याचा प्रयत्न कराल. ऐहिक गोष्टींची कामना करू नये. मनात नसतानाही प्रवास करावा लागेल. ढोंगी लोकांविषयी तिटकारा दाखवाल. ठाम निर्णयावर भर द्यावा.



धनू:-

अचानक धनलाभ संभवतो. योग्य संधीसाठी वाट पहावी लागेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. मित्रांशी मतभेद संभवतात. भडकपणे मत मांडू नका.



मकर:-

शांत संयमी विचार कराल. जोडीदाराची कर्तबगारी दिसून येईल. जबाबदारीने कामे उरकाल. चार-चौघांत कौतुक केले जाईल.कामात पत्नीचा हातभार लाभेल.



कुंभ:-

अधिकारी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. कामातील दिरंगाई टाळावी. वडीलांच्या मताचा आदर करावा. इतरांना आनंदाने मदत कराल. श्रद्धेची बाजू लक्षात घ्यावी.



मीन:-

रेस जुगारातून लाभ संभवतो. सतत काळजी करत बसू नये. मुलांचा उडणारा गोंधळ दूर करावा. भावनेच्या भरात वाहवून जाऊ नये. आवडीचे पदार्थ खायला मिळतील.


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies