Type Here to Get Search Results !

४ दिवसानंतर शेतात आढळला बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह!



अटकळी येथील एक व्यक्ती मागील ४-५ दिवसांपासून घरातून बेपत्ता झाली होती. नांदेड-देगलूर राज्य महामार्गापासून काही अंतरावर केरूर शेतात आज सकाळी त्या व्यक्तीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच रामतीर्थ पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



अटकळीतील भगवान नारायण नवघरे नावाची व्यक्ती ४-५ दिवसांपासून बेपत्ता झाली होती. आज सकाळी आठच्या सुमारास नांदेड-देगलूर राज्य महामार्गापासून काही अंतरावर केरूर शिवारात त्या व्यक्तीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. स्थानिकांकडून या घटनेची माहिती मिळताच रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनी विजय जाधव यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी शोधकार्य सुरु केले. मृतदेह सडल्यामुळे त्याची ओळख पटविणे अवघड होते. शेवटी ४-५ तासांनंतर त्याची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. परंतु, त्याचा मृत्यू कसा झाला, याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies