"या" धरणाचे पायथा वीजगृह बंद; जाणून घ्या सविस्तर माहिती...

 



महानिर्मिती कंपनी संघटनांनी पुकारलेल्या संपामुळे कोयना धरण पायथा वीजगृहातील दोन जनित्रे बंद पडली आहेत. यामुळे पूर्वेकडील सिंचनासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने सोमवारी सकाळी अकरा वाजता धरण भिंतीच्या पायथ्याशी असणाऱ्या आपत्कालीन दरवाजातून प्रतिसेकंद सिंचनासाठी पूर्वेकडे प्रतिसेकंद २ हजार ९८ क्युसेक्स पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती उपअभियंता कोयना धरण व्यवस्थापनाने दिली आहे.



आपल्या विविध मागण्यांसाठी महानिर्मिती कंपनीच्या काही संघटनांनी २८ व २९ मार्चला संप  पुकारला आहे. या संपाचा कोयना जलविद्युत निर्मिती प्रकल्पालाही फटका बसला आहे. यामुळे कोयना धरणाच्या पायथ्याशी असणारा वीज निर्मिती प्रकल्प आता बंद पडला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured