Type Here to Get Search Results !

सोन्याच्या दरात किंचित घसरण, जाणून घ्या सविस्तर माहिती...!मुंबई : सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण पहायला मिळत आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार दहा ग्रॅम अर्थात प्रति तोळा 22 कॅरट सोन्याची किंमत आज 47 हजार 640 रुपये इतकी झाली आहे. तर बुधवारी 22 कॅरट सोन्याची किंमत 47750 इतकी होती. आज सोन्याच्या दरामध्ये कालच्या तुलनेत 110 रुपयांची किरकोळ घट झाली आहे. तर दुसरीकडे चांदीचे आजचा दर 67 हजार 400 रुपये प्रति किलो एवढा आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ -उतार सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. रशिया  आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा जागतिक बाजारपेठेवर परिणाम झाला असून, काही दिवसांपूर्वी सोन्याच्या किंमती चांगल्याच कडाडल्या होत्या, मात्र त्यानंतर त्यामध्ये घसरण पहायला मिळाली. आज देखील सोन्याच्या किमतींमध्ये किंचितशी घसरण झाली आहे.गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47640 इतका आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर 51,970 इतका आहे.


 पुण्यात आज 22 कॅरट सोन्याचा भाव 47690 इतका आहे, तर 24 कॅरट सोन्याची किंमत 52020 इतकी आहे. 


नागपूरमध्ये 22 आणि 24 कॅरट सोन्याचा प्रति तोळा दर अनुक्रमे 47690 आणि 52020 रुपये इतका आहे. तर चांदीचा दर प्रति किलो 67 हजार 400 रुपये एवढा आहे. 

.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies