Type Here to Get Search Results !

टेस्लाने ग्राहकांकडून इलेक्ट्रिक कार परत मागवल्या, कारण…!


टेस्लाच्या गाड्यांबाबत जगभरातील ग्राहकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. टेस्लाने इलेक्ट्रिक कार विक्रीतून २०२१ या वर्षात ५ अब्ज डॉलर्स कमावले. तर २०२० या वर्षाती ही कमाई ३.४७ अब्ज डॉलर्स इतकी होती. टेस्लाने गेल्या वर्षी ९,३६,००० वाहनं वितरीत केली असून २०२० च्या तुलनेत दुप्पट आहे. असे असताना टेस्लाने अमेरिकेतील ९४७ इलेक्ट्रीक कार परत मागवल्या आहेत. रीअरव्ह्यू इमेज डिस्प्लेमध्ये विलंब होत असल्याने इलेक्ट्रिक वाहन निर्मात्याने तीन इलेक्ट्रिक कार मॉडेल्स परत मागवण्यास सुरुवात केली आहे. नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी अॅडमिनिस्ट्रेशनच्या म्हणण्यानुसार, कार रिव्हर्स घेताना रीअरव्यू इमेज दिसण्यास उशीर होत होता.


टेस्लाच्या रिकॉलमध्ये २०१७ आणि २०२० दरम्यान उत्पादित मॉडेल ३ इव्ही, २०१८ आणि २०१९ दरम्यान उत्पादित मॉडेल एस कार आणि त्याच कालावधीत विकल्या गेलेल्या मॉडेल X चा समावेश आहे. या इलेक्ट्रिक कार ऑटोपायलट कॉम्प्युटर २.५ ने सुसज्ज आहेत. टेस्लाने सांगितले की, “समस्येचे निराकरण करण्यासाठी ओव्हर-द-एअर सॉफ्टवेअर अपडेट करेल.”


टेस्ला आणि सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून आयात शुल्कावरून चर्चा सुरु आहे. “भारतात कार लाँच करण्यात अजूनही अडचणी आहेत”, असे टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी जानेवारी महिन्यात सांगितले होते. टेस्लाला आतापर्यंत भारतातील चाचणी एजन्सींकडून सात कारसाठी मंजुरी मिळाली आहे. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कंपनीने पंतप्रधान कार्यालयाकडे आयात कर कमी करण्याची विनंती केली होती. मात्र स्थानिक कार उत्पादक कंपन्यांनी टेस्लाच्या विनंतीला विरोध केला आहे. असा निर्णय घेतल्यास देशांतर्गत उत्पादनातील गुंतवणुकीला धक्का बसेल असे सांगण्यात येत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies