Type Here to Get Search Results !

वाढती उष्णता; प्राणिसंग्रहालयातील विविध प्राण्यांच्या विभागात फॉगर!








पुणे : सध्या उन्हाळा वाढत आहे व १० ते ४ या दरम्यानचे तापमानही जास्त असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सध्या पुण्यातील राजीव गांधी कात्रज प्राणीसंग्रहालय याठिकाणी वाघांचे  या कडक उन्हापासून संरक्षण व्हावे, म्हणून  फॉगर लावण्यात आले आहेत.



अशाप्रकारे फॉगर लावून प्राण्यांची उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जात आहे. उन्हाळ्यात फिरायला येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. ऊन प्रचंड प्रमाणात वाढल्याने प्राणीसंग्रहालयातील विविध प्राण्यांच्या विभागात फॉगर लावण्यात आले आहेत. प्राणीसंग्रहालयातील विविध प्राण्यांची विशेष काळजी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घेतली जाते.



तसेच, दरवर्षी येथील प्राण्यांसाठी सुविधा निर्माण करण्यात येत असतात. त्यात प्राण्यांना उन्हाच्या झळा लागू नयेत, म्हणून व्यवस्था केली जात असते. आता फॉगर लावण्यात आले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात उन्हाचा चटका प्राण्यांना लागणार नाही.व प्राण्याना सुरक्षित ठेवता येईल.




 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies