Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांसाठी खुशखबर, पीएम किसान योजनेच्या "या" अपडेटसाठी पुन्हा मुदतवाढ; जाणून घ्या सविस्तर माहिती.

 PM किसान योजनेची e-KYC अपडेट करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या 12.53 कोटी शेतकऱ्यांसाठी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अनिवार्य असणारी eKYC आता 22 मे पर्यंत पूर्ण करता येईल.


या आधी त्याची शेवटची तारीख ३१ मार्च होती. PM किसानचा पुढचा किंवा 11 वा हप्ता 1 एप्रिल 2022 नंतर कधीही तुमच्या खात्यात येऊ शकतो, परंतु जर तुम्ही ई-केवायसी पूर्ण केली नसेल तर येणारा 2000 रुपयांचा हप्ता थांबू शकतो. 


दरम्यान UIDAI कडून प्राप्त झालेल्या अधिसूचनेनुसार, UIDAI च्या OTP सेवा जारी केल्यामुळे, OTP सत्यापित करत असताना पुढील प्रतिसाद मिळण्याकरिता विलंब होत आहे. यामुळे ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी 31 मार्च 2022 ही शेवटची  तारीख बदलण्यात आली आहे. पोर्टलवरील नवीन शेवटची  मुदत वाढवून आता 22 मे 2022 अशी केली आहे.


ई-केवायसी कशी पूर्ण करायची 

प्रथम तुम्ही तुमच्या मोबाईल फोन ब्राउझरच्या क्रोम आयकॉनवर टॅप करा आणि तेथे pmkisan.gov.in टाइप करा. नंतर तुम्हाला पीएम किसान पोर्टलचे मुखपृष्ठ दिसेल, त्याच्या खाली  गेल्यानंतर ई-केवायसी पर्याय दिसेल. यावर टॅप करा. त्यानंतर त्यात तुमचा आधार क्रमांक टाका आणि सर्च बटणवर टॅप करा.

आता त्यात आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका. यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर 4 अंकी OTP येईल. हा OTP तेथे दिलेल्या बॉक्समध्ये टाइप करा.


 यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला आधार प्रमाणीकरणासाठी असणाऱ्या बटणावर टॅप करण्यास सांगितले जाईल. त्यावर टॅप करा आणि आता तुमच्या आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर आणखी 6 अंकी OTP येईल. तो भरा आणि सबमिट वर टॅप करा.


जर ह्या सर्व प्रक्रिया पूर्ण असतील तर eKYC यशस्वीरित्या पूर्ण होईल, अन्यथा Invalid असा संदेश येईल. असे झाल्यास तुमचा हप्ता येण्यास उशीर होऊ शकतो. जर तुमचे eKYC आधीच पूर्ण झाले असेल तर eKYC आधीच पूर्ण झाले आहे असा संदेश दिसेल. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशात आणखी १२ कोटी शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे.


11वा हप्ता कधी येणार


हिंदू नववर्षाच्या दिवशी किंवा रामनवमीच्या दिवशी 10 एप्रिलला पंतप्रधान मोदी सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात 11व्या हप्त्याची रक्कम पाठवण्याची शक्यता आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना मोदी सरकारने 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू केली होती.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies