Type Here to Get Search Results !

ऑनलाइन फसवणूक: आढळल्या कपडय़ांऐवजी चिंध्या; खात्यातील १८ हजार रुपये!




ठाणे :  वकील ४२ वर्षीय वकील महिलेने एका संकेतस्थळावरून कपडय़ांची खरेदी केली होती. त्यांच्या घरी कपडय़ांऐवजी चिंध्या पाठविण्यात आल्या आहेत. यासंबंधीची तक्रार देण्यासाठी संपर्क साधला असता त्यांच्या खात्यातील १८ हजार रुपये गाय बकेले . या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



प्राप्त माहितीनुसार, सदर महिलेने   महिन्याभरापूर्वी   ऑनलाइन खरेदी अ‍ॅपवरून ३७४ रुपयांचे कपडे खरेदी केले होते. पाच दिवसांनी एक भरलेला खोका त्यांच्या घरी पोहचला. त्यांनी खोका उघडून पाहिला असता त्यामध्ये फक्त कपडय़ाच्या चिंध्या आढळून आल्या . त्यानंतर महिलेने गूगलवर संबंधित कंपनीच्या ग्राहक सेवा क्रमांकाचा शोध घेतला. त्यांना एक मोबाइल क्रमांक आढळून आला होता. त्यांनी त्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून संबंधित व्यक्तीस घडलेला प्रकार सांगितला. त्या व्यक्तीने त्यांच्या मोबाइलवर एक अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. महिलेने अ‍ॅप डाऊनलोड करताच त्यांच्या बँक खात्यातील १८ हजार रुपये त्या व्यक्तीने काढून घेतले. या प्रकरणी आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर काही दिवसांपूर्वीच या महिलेने ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies