येथील विमानतळावर फुटले विमानाचे चक्क टायर....!
लोहगाव: येथील विमानतळावरून जाणाऱ्या एका विमानाचे टायर फुटल्यामुळे विमानांच्या उड्डाणावर मोठा परिणाम झाला आहे. ही घटना आज एकच्या सुमारास घडली. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहे. लोहगाव विमानतळावर उड्डाण करत असतानाच या  विमानाचे टायर फुटले. त्यामुळे धावपट्टी देखील खराब झाल्याने  विमानतळ प्रशासनाने तत्काळ विमानसेवा बंद केली.
 परिणामी, प्रवाशांना  विमानतळावरच थांबावे लागले आहे. त्यामुळे विमानतळ परिसरात प्रचंड गर्दी झाली आहे. विमानतळाचे दिवसाचे 70 ते 80 विमान उड्डाणांचे शेड्यूल ठरलेले असते. मात्र या घडलेल्या घटनेमुळे पूर्ण शेड्यूलवर परिणाम झाला. याचा फटका विमानतळ प्रशासनासोबतच सर्वाधिक प्रवाशांना बसला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured