Type Here to Get Search Results !

जमीन व्यवहारांप्रकरणी उकेंना ईडीकडून अटक!




जमीन व्यवहारांप्रकरणी ईडीकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उकेंवर पहाटेपासून कारवाई सुरू आहे. ईडीचे पथक सकाळीच नागपुरात पोहोचले  आणि धडक कारवाईला सुरुवात झाली. उके यांच्या घराची झडती घेतल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. एका जमीनीच्या प्रकणात ही कारवाई झाली. दरम्यान त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली असून त्यांना मुंबईला नेले जाईल अशी माहिती मिळाली आहे.




राज्यभरातील सत्ताधारी पक्षातील नेते, त्यांचे कुटुंबीय आणि नीकटवर्तीय अशा अनेकांवर आजपर्यंत ईडीचे छापे पडले आहेत. त्यातच आज सकाळी अचानक नागपुरात ईडीने कारवाई केली. अॅडव्होकेट सतीश उके यांच्या घरावर आज सकाळी सक्तवसुली संचलनालयाने कारवाई केली. अनेक तासांच्या चौकशीनंतर त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. ही करवाई राजकीय हेतूने केल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुढे नाना पटोले यांच्यावर ईडीच्या धाडी पडल्यास आश्चर्य वाटणार नाही असे म्हटले आहे. उकें यांच्या कुटुंबियांकडून या कारवाईबद्दल देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरण्यात आले आहे .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies