Type Here to Get Search Results !

संगीत श्रेत्रासाठी दु:खाची बातमी ; "या" गायकाचे निधन!






ब्रिटीश-आयरिश बॉय बँड ‘द वॉन्टेड’चा सदस्य गायक टॉम पार्कर यांचे निधन झाले आहे. तो ३३ वर्षांचा होता. टॉमच्या मृत्यूचे कारण ब्रेन कॅन्सर असल्याचे सांगितले जात आहे. टॉमच्या मृत्यूची पुष्टी त्याची पत्नी केल्सी हार्डविकने सोशल मीडियापोस्ट द्वारे  ही माहिती दिली आहे. ही दुःखद माहिती पाहून गायकाच्या चाहत्यांसह सेलिब्रिटींनीही श्रद्धांजली वाहिली आहे.



टॉम पार्करच्या मृत्यूबद्दल माहिती देताना, त्याची पत्नी केल्सीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर टॉमचा एक कुटुंब आणि एकल फोटो शेअर केला आहे. पोस्टच्या पहिल्या ब्लॅक अँड व्हाइट फोटोमध्ये टॉम कॅमेऱ्याकडे पाहताना पोझ देत आहे आणि दुसऱ्या फोटोमध्ये टॉम त्याच्या कुटुंबासह दिसत आहे. हे दोन फोटो शेअर करताना केल्सी म्हणाली, “टॉमचे काल सकाळी म्हणजे  ३० मार्च  रोजी  कुटुंबियांच्या उपस्थितीत निधन झाले आहे . आम्ही दु:खी आहोत, टॉम आमच्या जगाचा केंद्रबिंदू होता आणि आम्ही त्याच्या उपस्थितीशिवाय जीवनाची कल्पना करू शकत नाही. तुमच्या सर्व प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही सदैव ऋणी राहू.”



टॉम आणि केल्सीचे लग्न २०१८ मध्ये झाले होते. लग्नाच्या एक वर्षानंतर, केल्सीने पहिल्या बाळाला जन्म दिला. तर २०२० मध्ये तिने दुसऱ्या बाळाला जन्म दिला. ऑक्टोबर २०२० मध्ये टॉमला कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर त्याच्यावर केमोथेरपी आणि रेडिओथेरपी सुरू होती पण अखेर त्याने जगाचा निरोप घेतला.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies