Type Here to Get Search Results !

केंद्राकडून युरियावर प्रति गोणी ३७०० रुपये सब्सिडी;जाणून घ्या सविस्तर माहितीनवी दिल्ली; केंद्र सरकार युरियावर प्रति गोणी सुमारे ३७०० रुपये सब्सिडी देत आहे. शेतकऱ्यांना युरियासह अन्य खते कमी दरात मिळावीत यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी सरकार युरिया सब्सिडीचा मोठा भार उचलत आहे, अशी माहिती केंद्रीय खते व रसायन मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना सब्सिडी दरात मिळणाऱ्या युरियाची मूळ किंमत किती आहे याचीही माहिती दिली. भारतात युरियाची किंमत प्रति गोणी २६६.७० रुपये आहे. तर पाकिस्तानात ८०० रुपये, इंडोनेशियात ६०० रुपये, चीनमध्ये २,१०० रुपये, बांगलादेशात ७१९ रुपये, अमेरिकेत ३,०६० रुपये आणि ब्राझीलमध्ये ३,६०० रुपये युरियाची किंमत असल्याचे मांडविया यांनी सांगितले. खतांच्या वाढत्या किमतीचा भार शेतकऱ्यांवर पडू नये यासाठी सरकार सब्सिडीचा मोठा भार उचलत असल्याचे त्यांनी संगितले आहे. दरम्यान, खते व रसायन राज्य मंत्री भगवंत खुबा यांनी म्हटले की, केंद्र सरकार सर्व राज्यांना एकाच दरात खतांचा पुरवठा करते. किमतीवरून राज्यांत भेदभाव केला जात नाही. सरकारला शेतकऱ्यांच्या हिताची काळजी आहे. कमी  दरात पुरेशा प्रमाणात खते उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies