मुंबई : स्मृतिभ्रंश हा असा आजार आहे, ज्यामध्ये पीडित व्यक्तीसह त्याच्या कुटुंबीयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. स्मृतिभ्रंशामुळे, वयानुसार व्यक्तीची मानसिक स्थिती अधिकच वाईट होत जाते. स्मृतीभ्रंशामुळे व्यक्तीला त्याची दैनंदिन कामे करणे खूप अवघड होत जाते. रुग्ण अधिकाधिक पध्दतीने आपल्या कुटुंबावर अवलंबून राहू लागतो. इतर लोकांपेक्षा वृध्दांमध्ये या रोगाचा प्रभाव जास्त असतो. या आजाराची लक्षणे प्रामुख्याने वयाच्या 65 वर्षांनंतर दिसून येतात. दरम्यान, हा आजार मध्यम वयापासूनच सुरू होतो. या आजारासाठी झोपेच्या सवयी, आहार आणि नैराश्य यासारखी अनेक कारणे प्रामुख्याने कारणीभूत ठरत असतात. यासोबतच एक अतिशय सामान्य औषध देखील स्मृतिभ्रंश वाढण्यास कारणीभूत आहे. हे औषध घेतल्याने स्मृतिभ्रंश होण्याचा धोका वाढू शकतो,
त्याचे दुष्परिणाम खालीलप्रमाणे
PLOS One मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, मध्यम वयात अँटिबायोटिकचे सेवन केल्यानंतर व्यक्तीची स्मरणशक्ती हळूहळू कमजोर होऊ लागते. विशेषत: महिलांना या समस्येचा अधिक सामना करावा लागतो. अभ्यासादरम्यान, संशोधकांना आढळले, की बॅक्टेरियाच्या संसर्गापासून मुक्त होण्यासाठी अँटिबायोटिक घेतल्याने स्मरणशक्ती कमी होते. सर्व महिलांना त्यांची स्मरणशक्ती मोजण्यासाठी संगणकीकृत चाचणी घेण्यास सांगण्यात आले. अभ्यासाअंती असे समोर आले की ज्या महिलांनी मधल्या काळात सतत दोन महिने अँटीबायोटिक्स घेतल्या आहेत, त्यांच्या स्मरणशक्तीवर खूप वाईट परिणाम झालेला दिसून आला आहे. या महिलांची स्मरणशक्ती खूपच कमकुवत झाली.
अँटिबायोटिक्समुळे स्मरणशक्तीवर कसा परिणाम खालीलप्रमाणे
दरम्यान, आरोग्याच्या समस्या असल्यास डॉक्टरांकडून रुग्णांना अँटिबायोटिक्स दिली जातात. हा नवीन अभ्यास अँटिबायोटिक्सचा दीर्घकालीन वापर आणि त्याचे स्मरणशक्तीवर होणारे दुष्परिणाम स्पष्ट करणारा आहे. परंतु केवळ अँटिबायोटिक्सच्या वापरामुळे महिलांच्या स्मरणशक्तीवर परिणाम होतो, हे अभ्यासात स्पष्ट झालेले नाही. अँटिबायोटिक्सच्या वापरामुळे स्मरणशक्तीवर कसा परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी अधिकाधिक लोकांचा अभ्यासात समावेश करणे आवश्यक आहे.
स्मृतीभ्रंशाची कारणे
वय
सकस आहार आणि व्यायामाचा अभाव
दारूचे जास्त सेवन
हृदयरोग
नैराश्य
मधुमेह
धुम्रपान
वायू प्रदूषण
डोक्याला गंभीर दुखापत
शरीरात जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वांची कमतरता
स्मृतिभ्रंशाची लक्षणे
एकाच गोष्टीची वारंवार पुनरावृत्ती करणे
काय होतयं ते समज नाही
बोलण्यात अडखळणे
जुन्या गोष्टी आठवणे
काहीच लक्षात न राहणे
विचार करण्याची क्षमता कमी होणे
सतत काहीतरी बोलत राहणे
आजूबाजूला कोणी नसताना स्वतःशी बोलणे
स्मरणशक्ती कमी होणे