Type Here to Get Search Results !

अहिल्यादेवी पुतळ्याचे अनावरण करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक...!


सांगली : माधवनगर – मिरज रस्त्यावरील पुण्यश्लोकअहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. पोलिसांनी मोर्चा रोखला. परंतु पोलिसांना चकवा देत ड्रोनच्या सहाय्याने अनावरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु ड्रोन पडल्याने हा प्रयत्न फसला. यावेळी तिघांना ताब्यात घेण्यात आले.


पुतळा अनावरण करण्यासाठी पडळकर काही कार्यकर्त्यांसह दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. वसंतदादा सूतगिरणी चौकातून कार्यकर्ते पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून आत घुसले. यावेळी ड्रोनने अहिल्यादेवीच्या स्मारकावर पुष्पवृष्टी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे. यातील एकजण ड्रोनचा मालक असल्याचे समजले. झेंडे घेऊन स्मारकाकडे निघालेल्या चार-पाच कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies