Type Here to Get Search Results !

लग्नाचे आमिष दाखवून केला युवतीवर बलात्कार!




नंदुरबार : मध्यप्रदेश राज्यातील पानसेमल येथील विद्यार्थिनी शहादा महाविद्यालयात B.COMचे शिक्षण घेत असताना शहादा शहरातील जिनेश चंपालाल जैन कॉफी हाऊसचे संचालक यांनी सदर विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून गेल्या दोन वर्षापासून छळ केला तसेच तिच्यावर वारंवार बलात्कार केला. व लग्नाला नकार देऊन Video व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली.



आरोपीच्या अत्याचाराला कंटाळून अखेर पीडित तरुणीने आणि तिच्या परिवाराने मध्य प्रदेश पानसेमल येथील पोलीस ठाण्यात जिनेश चंपालाल जैन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने पानसेमल पोलिसांनी जिनेश चंपालाल जैन याला शहादा शहरातून त्याच्या कॉफी हाऊस मधून अटक केली आहे. 



 शहादा महाविद्यालयात B.com चे शिक्षण घेत असताना जिनेश व त्यांची मैत्री जमली लग्नाचे आमिष दाखवून गेल्या दोन वर्षापासून सदर विद्यार्थिनीचा छळ करत होता. तसेच लग्नाला नकार दिल्यानंतर तरुणीचे व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत होता. याप्रकरणी पानसेमल पोलिसांनी जिनेश याला अटक केली असून अधिक कारवाई सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies