Type Here to Get Search Results !

सोशल मीडियावरील एका मॅसेजने साक्री शहर कडकडीत बंद; काय आहे प्रकरण......

 



धुळे:धुळे जिल्ह्यातील साक्री शहरांमध्ये धुलीवंदनाच्या दिवशी डीजे बंद करण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. या प्रकरणात एका गटाकडून हल्लेखोर युवकांवर कारवाई करण्याची मागणी करत प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये दुसर्‍या गटावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले. ही दंगल पूर्वनियोजित असल्याचा आरोप देखील या निवेदनात करण्यात आला. या सर्व प्रकाराची दखल घेत पोलिस प्रशासनाने कायदेशीर कारवाई केली. दोन गटातील या दंगलीमुळे शहराचे वातावरण तणावाचे तयार झाले.



पण हा तणाव निवळला असताना काल अचानक सोशल मीडियावरून साक्री शहर बंद करण्याचे आवाहन व्हायरल झाले. हा मेसेज हिंदुत्ववादी संघटनेच्या नावाने व्हायरल झाला. दरम्यान या मेसेजची दखल घेत आज साक्री शहर कडकडीत बंद पाळण्यात आला. साक्री शहरात आज सकाळपासूनच नागपूर सुरत महामार्ग लगतची सर्व दुकाने तसेच शहरातील प्रमुख बाजारपेठेतील दुकाने व्यापाऱ्यांनी बंद ठेवून आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी साक्री शहरांमध्ये तळ ठोकला आहे. त्याचप्रमाणे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण मैराळे यांच्यासह पोलीस स्टेशनच्या सर्वच अधिकाऱ्यांनी संवेदनशील विभागांमध्ये बंदोबस्त लावला आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies