Type Here to Get Search Results !

दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याला पकडण्यात वनखात्याला यश ; कोपर गावातील नागरिकांना मोठा दिलासा!

 .
विरार : विरार पूर्वेच्या जंगलाला लागून असलेल्या कोपर गावात मागील काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. शेवटी वनविभागाने या भागात सापळा लावून बिबट्याला जेरबंद करण्यास यश मिळविले आहे.विरार पूर्वेच्या भागात जंगलाला लागूनच कोपर गाव आहे. या भागातही मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे. या भागातील नागरिकांना आठवडाभरापूर्वी काही नागरिकांना बिबट्याचा वावर होत असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्याच्या भीतीने नागरिकांना जागरण करून पहारा द्यावा लागत होता.बिबट्याच्या भीतीमुळे गावकऱ्यांना घराच्या बाहेर पडण्यासही अडचणी निर्माण होत होत्या. तर दोन दिवसांपूर्वी या भागातील चार पाळीव श्वानांचाही फडशा या बिबट्याने पाडल्याचे समजताच येथील वातावरण अधिक भीतीचे झाले होते. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार मांडवी वनविभागाने बिबट्याचा शोध घेण्यासाठी जागोजागी कॅमेरे लावले होते तर मंगळवारी या भागात पथके तैनात करून पिंजरा लावून सापळा लावण्यात आला होता.बुधवारी पहाटेच्या सुमारास लावण्यात पिंजऱ्यात हा बिबट्या अडकून पडला. अखेर या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. बिबट्या जेरबंद झाल्याने मागील काही दिवसांपासून भीतीच्या सावटाखाली असलेल्या कोपर गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies