Type Here to Get Search Results !

लवकरच महिला आयपीएलला सुरुवात; बीसीसीआयचा मोठा निर्णय!

नवी दिल्ली: आयपीएलच्या १५ व्या हंगामाचा थरार आजपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी गतविजेता संघ चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ एकमेकांना भिडतील.तसेच, एकीकडे आयपीएलच्या १५ व्या हंगामाची सगळीकडे चर्चा असताना आता महिला आयपीएल संदर्भात एक मोठी माहिती समोर येत आहे. बीसीसीआय २०२३ पासून महिला आयपीएल सुरु करण्याचा विचार करत आहे. त्या दृष्टीने बीसीसीआयने पाऊले टाकण्यास सुरुवात केली असून काल म्हणजेच २५ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली आहे.प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी गव्हर्निंग काऊन्सिलच्या सदस्यांची तब्बल दोन वर्षानंतर प्रत्यक्षपणे बैठक पार पडली. या बैठकीत महिला आयपीएलवर चर्चा करण्यात आली आहे. तसेच महिला आयपीएलचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न करण्याचा ठराव  या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. महिला खेळाडूंच्या सहा संघाचा समावेश असलेली महिला आयपीएल स्पर्धा खेळवण्याची व्यवहार्यता तपासण्याचेही या बैठकीत मान्य करण्यात आले आहे.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies