Type Here to Get Search Results !

दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही आता हेल्मेट अनिवार्य; विनाहेल्मेट वाहनधारकांना पेट्रोल पंपांवर कारवाई!




नाशिक : नाशिक शहरात लागू असणाऱ्या हेल्मेट सक्तीचा परीघ आता विस्तारला असून दुचाकीस्वारासोबत मागे बसणाऱ्यासही हेल्मेट घालणे अनिवार्य झाले आहे. आता दुचाकीवर प्रवास करणाऱ्या प्रत्येकास हेल्मेट परिधान करावे लागणार आहे. दुचाकीस्वारांना हेल्मेटविना पेट्रोल देण्यास प्रतिबंध असूनही अनेक पंपांवर या नियमाचे पालन होत नाही. त्यामुळे अशा प्रकारे पेट्रोल पंपांवर वाहनचालकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.



दीपक पाण्डय़े (पोलीस आयुक्त, नाशिक)यांनी दिलेल्या माहितीनुसार, हेल्मेट सक्तीची मोहीम आता दोन स्तरांवर राबविली जाणार आहे. दुचाकीवर चालकासोबत मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट घालणे बंधनकारक व सक्तीचे आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर समुपदेशनासोबत दंडात्मक कारवाई केली जाईल. ज्या पेट्रोल पंपावर विनाहेल्मेट वाहनधारकांना पेट्रोल दिले जाते, त्या पंपांवर चालकांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करीत आहेत, असे गृहीत धरून गुन्हा दाखल केला जाईल. असे प्रकार एकापेक्षा अधिक वेळा झाले तर तो पेट्रोल पंप धोकादायक झाला आहे, असे समजून तो बंद का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावली जाणार आहे.




गुढी पाडव्यापासून शहरात दुचाकीवर प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस हेल्मेट बंधनकारक राहणार आहे. म्हणजे चालक आणि त्याच्यासोबत असणारा सहप्रवासी अशा दोघांनाही हेल्मेट घालावे लागेनार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांना दंडात्मक कारवाईला तोंड द्यावे लागणार असल्याचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डय़े यांनी सांगितले आहे. वाहनधारकांच्या समुपदेशनाची व्यवस्था काही ठिकाणी केली जाणार आहे. अनेक पेट्रोल पंपांवर हेल्मेटच्या नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे हेल्मेट नसणाऱ्या दुचाकीस्वारांना पेट्रोल देणाऱ्या पंपाला धोकादायक पंप समजून तो बंद करण्याची कारवाई का करू नये, अशी नोटीस पाठवली जाणार आहे. तसेच, ही मोहीम राबविताना यापूर्वी पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि वाहनधारक यांच्यात वाद झाल्याचा इतिहास आहे. पेठ रस्त्यावरील पंपावर काही युवकांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. त्यानंतर सर्वच पंपांवर पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. नव्याने मोहीम राबविताना पंपांवर पोलीस कर्मचारी नियुक्त केले जातील की नाही, हे अजून स्पष्ट झालेले नाही. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies