Type Here to Get Search Results !

औरंगाबादमध्ये खासगी कुरिअर कंपनीतून पोलिसांनी केल्या ३७ तलवारी केल्या जप्त!




औरंगाबाद :औरंगाबाद शहरातील खासगी कुरिअर कंपनीतून पोलिसांनी केल्या ३७ तलवारी जप्त. या तलवारींची ज्यांनी केली होती मागणी त्यांची पोलीस स्वतंत्र चौकशी करणार आहेत. या पूर्वीही औरंगाबाद पोलिसांनी अशा प्रकारची कारवाई केल्यानंतर ऑनलाइन हत्यार विक्री करणाऱ्या कंपन्यानवर कारवाई करता येईल अशी चाचपणी पोलिसांनी केली होती.परंतु, यात त्यांना यश मिळाले नव्हते. आता पुन्हा डिटीडीसी खासगी टपाल वाहतूक कंपनीतून ३७ तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. अमृतसर व जालंधर येथून  मागवण्यातआलेल्या तलवारी नक्की कोणत्या कारणासाठी  मागविल्या होत्या व कोणी मागवल्या आहेत याची चौकशी पोलिस करत आहेत.



 वाढदिवसाच्या कार्यक्रमात केक कापण्यासाठी तलवारींचा उपयोग करणे ही फॅशन म्हणून केली जात आहे. पोलिसांना खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार  आज सकाळी छापा टाकून ही करवाई करण्यात आली होती असे  पोलीस उपायुक्त उज्वला वनकर याच्या कडून ही माहिती मिळाली आहे . महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखावी  जावी यासाठी पोलीस अत्यंत प्रयत्न करत असले तरी कुरिअर कंपनीकडून शहरात तलवारी येत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास करणे पोलिसांना अत्यंत आवश्यक आहे .



 क्रांती चौक पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विकास खटके यांनी ही कारवाई केली आहे.पोलीस उपायुक्त उज्वला वनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, डीटीडीसी या कुरियर मार्फत ३७ तलवारी मागविण्यात आल्या असून यामागे कोण आहे, याचा शोध आम्ही घेणार आहोत. तसेच यापूर्वी अशीच एक घटना घडली होती, त्या प्रकरणातील लोकांचा यात सहभाग आहे की नाही, याची तपासणी सुरू आहे.  






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies