Type Here to Get Search Results !

“या” स्वभावाच्या लोकांशी मैत्री करू नका; असे मित्र वेळ आल्यावर तुमची फसवणूक करू शकतात!


आटपाडी: निती शास्त्रामध्ये आचार्य चाणक्य यांनी जीवनाविषयी खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य नीतीनुसार माणसाचे आयुष्य अनमोल असते. जो वेळ जातो तो पुन्हा परत येऊ शकत नाही. अशा वेळी वेळेचा सदुपयोग करून जीवन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आचार्य चाणक्य यांच्या मते, कोणत्याही मनुष्याच्या यशात चांगली संगत खूप मोठा प्रभाव पाडते. त्यांना प्रत्येक पायरीवर यश मिळते. तसेच जे लोक संगत निवडताना काळजी घेत नाहीत, त्यांना प्रत्येक क्षणी आव्हाने आणि संकटांना सामोरे जावे लागते. यासाठी, चाणक्यजी यांच्या मते खऱ्या मित्राची ओळख खूप महत्त्वाची असते. खरा मित्र तोच असू शकतो जो नेहमी योग्य मार्ग दाखवतो. तसेच तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवतो. तसेच, सुख-दुःखात नेहमी साथ देत असतो. चुकीचा मित्र संकटात टाकून आयुष्य बिघडवू शकतो. त्यामुळे खरा मित्र ओळखल्यानंतर त्याच्याशी मैत्री करायला हवी.चुकीच्या संस्कारांनी किंवा चुकीच्या सवयींनी वेढलेल्या अशा लोकांना विसरून कधीही मित्र बनवू नये. तसेच जे नेहमी स्वार्थ जपतात, तेही चांगल्या मित्रांच्या श्रेणीत येत नाहीत. असे मित्र वेळ आल्यावर फसवणूक करू शकतात. त्यामुळे त्यांच्याशी सावधगिरी बाळगली पाहिजे. तसेच, माणसावर वाईट वेळ आल्यावर खरा मित्र ओळखला जातो. वाईट काळात मैत्रीची ओळख होते. जे खरे मित्र नाहीत ते वाईट काळात साथ देत नाहीत. असे मित्र स्वार्थी, लोभी असतात.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies