Type Here to Get Search Results !

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पेट्रोल पंपचालकांवर दाखल होणार गुन्हा....!

 



नाशिक : शहरात दुचाकीस्वारांसाठी शनिवारपासून पुन्हा हेल्मेट सक्ती होणार असून विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यास दंडात्मक कारवाई होणार आहे. तर विना हेल्मेट दुचाकीचालकास पेट्रोल देणाऱ्या पेट्रोल पंपचालकावर दुचाकीस्वारास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार असल्याचा इशारा पोलिस आयुक्त दीपक पाण्डे्य यांनी दिला. 



अपघाती मृत्यू टाळण्यासाठी शहरात हेल्मेट सक्ती सुरु आहे. वेगवेगळे उपक्रम राबवून दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती केली आहे. त्यात विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांचे दोन तास समुपदेशन व परिक्षा घेतली जाते. त्याचप्रमाणे दंडात्मक कारवाई होत आहे. शासकीय-निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्थांमध्ये येणाऱ्या दुचाकीस्वारांकडे हेल्मेट नसल्यास परवानगी नाकारण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले होते. तर विनाहेल्मेट पेट्रोल भरण्यास आलेल्या दुचाकीस्वारांना पेट्रोल न देण्याचेही आदेश आहेत. सुरुवातीस या आदेशांचे पालन झाले. मात्र कालांतराने पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने या आदेशाचा सर्वांनाच विसर पडला.



 दरम्यान, आता शनिवारपासून नव्याने हेल्मेट सक्तीबाबत कारवाईचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार शहरात दुचाकीचालक व पाठीमागे बसलेल्या व्यक्तीसही हेल्मेट सक्ती करण्यात येत आहे. हेल्मेट नसल्यास दोघांवरही कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पेट्रोल पंपचालकांवरही गुन्हे दाखल होणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies