Type Here to Get Search Results !

गाय- म्हैसशीच्या दूध दरात दोन रूपयाने वाढ!





कोल्हापूर : दूध उत्पादक शेतकऱ्यांना म्हैस  व गाय दूध खरेदी दरामध्ये  शुक्रवारपासून दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी याबाबत बुधवारी म्हणजे आज ही माहिती दिली आहे .



गोकुळ संघ साडेपाच लाख दूध उत्पादकांकडून सुमारे १३ लाख लिटर दररोज दूध खरेदी करते. त्यामुळे या नव्या दरवाढीच्या निर्णयानंतर शेतकऱ्यांना प्रतिदिन २६ लाख रुपये अधिक मिळणार आहेत.म्हैस दूध खरेदी दराममध्ये  ६.० फॅट व ९.० एस.एन.एफ करीता खरेदी दर ४१.५० वरून ४३.५० रुपये इतका होणार आहे.



गाय दूध दरामध्‍ये ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ करीता २७ वरून २९ रूपयाने वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. गोकुळ दूध संघाने गुडी पाडव्‍यापूर्वी दूध उत्पादकांसाठी   दिलासा देणारी वाढ केली आहे. सुधारित दरपत्रक संघामार्फत प्राथमिक दूध संस्थाना पाठवण्यात येणार आहेत, असेही विश्वास पाटील यांनी सांगितले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies