Type Here to Get Search Results !

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : आज चेन्नईचा सामना लखनऊशी!

 





मुंबई:  अष्टपैलू खेळाडू मोईन अली संघात सामील झाल्यामुळे आज इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये होणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या लढतीत फलंदाजीची कामगिरी सुधारण्याचा चेन्नई सुपर किंग्जचा जोरदार प्रयत्न असेल.



चेन्नई आणि लखनऊ या दोन्ही संघांनी आपापले सलामीचे सामने गमावले आहेत. आघाडीच्या फळीचे अपयश ही दोन्ही संघांचा सामायिक समस्या आहे.तसेच,  ब्रेबॉर्न स्टेडियमवर नाणेफेकीचा कौलसुद्धा महत्त्वाचा ठरणार आहे, कारण दुसऱ्या डावात दवाचा घटक महत्त्वाचा ठरत आहे. चेन्नई आणि लखनऊ या दोन्ही संघांनी वानखेडे स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करीत सामने गमावले आहेत.



लखनऊचा कर्णधार केएल राहुल आणि भरवशाचा सलामीवीर क्विंटन डीकॉक यांनी पहिल्या सामन्यात निराशा केला. राहुलने आघाडीवर राहून मोठी खेळी उभारण्याची आवश्यकता आहे. याचप्रमाणे त्याच्या फलंदाजीच्या कौशल्याचाही कस लागणार आहे. मनीष पांडे आणि एव्हिन लेविस यांच्याकडून फटकेबाजीची अपेक्षा आहे. पहिल्या लढतीत आघाडीची फळी कोसळल्यावर मधल्या फळीतील दीपक हुडा, पदार्पणवीर आयुष बडोनी आणि कृणाल पंडय़ा या तिघांनी संघाचा डाव सावरला. लखनऊच्या गोलंदाजांनीही गुजरात जायंट्सविरुद्धच्या पराभवातून सावरत नव्या आव्हानासाठी तायार व्हायला हवे. वेगवान गोलंदाज दुष्मंता चमीराने लिलावातील आकडय़ाला न्याय देताना २२ धावांत २ बळी घेतले. परंतु साथीदार आवेश खानने पण ३.४ षटकांत ३३ धावा दिल्या आहेत.



कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात चेन्नईला फक्त १३१ धावा काढता आल्या होत्या. या धावसंख्येत महेंद्रसिंह धोनीच्या नाबाद ५० धावांचे महत्त्वाचे योगदान होते. गतहंगामात सर्वाधिक धावा काढणारा ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉन्वे, अंबाती रायुडू, शिवम दुबे हे फलंदाज अपयशी ठरले. नवा कर्णधार रवींद्र जडेजा आणि रॉबीन उथप्पा यांनी आपली जोरदार भूमिका बजावली आहे. लखनऊविरुद्ध मोईनला तिसऱ्या क्रमांकावर संधी दिली जाऊ शकते. ड्वेन प्रीटोरियस हासुद्धा पर्याय चेन्नईकडे उपलब्ध आहे. कोलकाताविरुद्ध अष्टपैलू ड्वेन ब्राव्होने टिच्चून गोलंदाजी करताना २० धावांत ३ बळी मिळवले आहेत . परंतु, अन्य गोलंदाजांना आपला प्रभाव दाखवता आला नाही. तुषार देशपांडे, अ‍ॅडम मिल्ने, मिचेल सँटनर, जडेजा, दुबे यांच्यासारखे गोलंदाज चेन्नईकडे आहेत.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies