Type Here to Get Search Results !

पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून गळफास घेत पतीची आत्महत्या!

 





भिवानी : पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून पतीने  गळफास घेऊन आत्महत्या  केल्याची घटना हरियाणातील भिवानी येथे घडली आहे. सुशील (44) आत्महत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी सुशीलने आत्महत्या नोट लिहिली होती. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर गुन्हा दखल करत पोलिसांनी तपास सुरु केला आहे. पत्नी आणि सासूच्या दररोजच्या मागण्या आणि धमक्यांना कंटाळून सुशीलने आपल्या मूळ गावी आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. 



मिळालेल्या माहितीनुसार, सुशील आणि त्याची पत्नी शीला हे दोघे काही वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. आता काही दिवसांपूर्वी त्यांनी मंदिरात लग्न केले होते. त्यानंतर दोघेही शीलाच्या आईच्या घरी राहत होते. पत्नी आणि सासू दररोज सुशीलकडे पैशांची मागणी करायच्या. पैसे दिले नाही तर दोघीही त्याला सतत धमकावत असत, अशी माहिती सुशीलचा भाऊ समशेरने दिली आहे. त्यामुळे, घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह आणि आत्महत्या नोट ताब्यात घेतले. सुसाईड नोट आणि नातेवाईकांच्या तक्रारीनुसार पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे. सध्या याप्रकरणाची चौकशी सुरु आहे. पोलिस तपासानंतरच दोषींवर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies