दरातील फरकामुळे पेट्रोल भरण्यासाठी महाराष्ट्रातील नागरिक गुजरातमध्ये!

गुजरात: महाराष्ट्रपेक्षा गुजरात राज्यात इंधनाचे भाव कमी असल्यामुळे महाराष्ट्रातील नागरिक गुजरातमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जात आहेत. महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमा भागांमध्ये हा प्रकार दिसून येत आहे. गुजरातच्या पेट्रोल पंपावर महाराष्ट्राच्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.
गुजरात राज्यात पेट्रोलचे दर महाराष्ट्रपेक्षा प्रति लिटरमागे १५ रुपयांहून अधिक कमी असल्याने महाराष्ट्रातील वाहनधारक आता गुजरात राज्यात पेट्रोल भरण्यासाठी जात आहेत. नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात असल्याने नंदुरबारपासून १२ किलोमीटरवर गुजरात राज्याची हद्द सुरु होते. यामुळे महाराष्ट्रातील नागरिक महाराष्ट्रातील पेट्रोल पंप सोडून गुजरात राज्यात पेट्रोल भरण्यासाठी जाताना दिसत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या पाच दिवसांपासून चार वेळा दरवाढ झाली असून एकूण ३ रुपये २० पैशांनी इंधन महागले  आहे. महाराष्ट्रात पेट्रोलचे भाव हे १२२ रुपये प्रति लिटर असून डिझेलचे भाव ९४ रुपये लिटरपर्यंत आहेत. तसेच, गुजरातमध्ये पेट्रोलचे भाव ९८ रुपये असून डिझेल ९२ रुपयांच्या जवळपास आहेत.त्यामुळे लीटरमागे १३ ते १५ रुपयांचा फरक पडत असल्याने ग्रामीण भागासह शहरातील नागरिक नंदुरबारपासून १२ किमी जवळ असलेल्या निझर तालुक्यात पेट्रोल भरण्यासाठी जातात. पेट्रोलची टाकी फूल केली तर जवळपास १८० ते २०० रुपये वाचतात म्हणून आम्ही गुजरात राज्यात पेट्रोल भरतो असे महाराष्ट्रातील नंदूरबारमधून गुजरातमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी सांगितले आहे. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured